ओरा: अदृश्य पण प्रभावशाली मानवी ऊर्जा

 


ओरा: अदृश्य पण प्रभावशाली मानवी ऊर्जा

सन १८९३. ठिकाण – अमेरिका, शिकागो. वर्ल्ड पार्लमेंट ऑफ रिलीजनमध्ये एक तरुण साधू व्यासपीठावर येतो आणि “Sisters and Brothers of America” हे शब्द उच्चारतो. दोन मिनिटांहून अधिक वेळ टाळ्यांचा गजर सुरू होतो. तो साधू म्हणजेच स्वामी विवेकानंद होते. त्यांचे शब्द जितके प्रभावी होते, तितकीच प्रभावशाली होती त्यांची उपस्थिती – आत्मविश्वास, तेजस्विता आणि सकारात्मक ऊर्जा यांचा संगम म्हणजे त्यांचे Aura – ज्याला आपण ओरा म्हणतो.

ओरा म्हणजे काय?

ओरा म्हणजे आपल्या शरीराबाहेरील एक ऊर्जा क्षेत्र, जी आपल्या विचारांपासून, भावना, आरोग्य आणि मानसिक स्थितीपासून निर्माण होते. ही एक प्रकारची वाइब्रेशनल फ्रीक्वेन्सी असते – जी आपण थेट पाहू शकत नाही, पण नक्कीच अनुभवू शकतो.

वाइब्स आणि अनुभूती

कधी कधी आपण कोणाशी न भेटताही त्यांच्याबद्दल चांगले किंवा वाईट वाटते. कधी कधी एखादी व्यक्ती फक्त शांत बसली असते, तरी ती आपले लक्ष वेधून घेते. तिच्याभोवती एक आकर्षण असते – हेच ओऱाचं प्रभाव आहे. विराट कोहली किंवा क्रिस्टियानो रोनाल्डो यांचा खेळात असताना असलेला आत्मविश्वास आणि उर्जा याचे सर्वांनाच जाणवते, तेही स्क्रीनच्या पलीकडून. त्यांचं Aura आपल्या पर्यावरणालाही उर्जित करतं.

शास्त्र काय सांगतं?

आपले शरीर केवळ मांसल आणि हाडांचे नाही, तर ऊर्जेचं बनलेलं आहे. आपल्या शरीरात चालणाऱ्या जैविक क्रियांमुळे एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड तयार होते, ज्याला Aura field म्हणतात. आपल्या श्वसन, रक्ताभिसरण, मेंदूतील संकेत या सर्व क्रियांमुळे ही ऊर्जा निर्माण होते.

किर्लियन फोटोग्राफी आणि ओऱाचं दर्शन

१९३९ मध्ये रशियन शास्त्रज्ञ सेमियन किर्लियन यांनी Kirlian Photography ही पद्धत विकसित केली, ज्याद्वारे कोणत्याही वस्तूच्या किंवा व्यक्तीच्या भोवती असलेल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक डिस्चार्जचं (Aura) चित्र काढता येतं. जरी काही वैज्ञानिक याला मेंदूचा भ्रम मानतात, तरीही ह्या चित्रांमध्ये रंग आणि ऊर्जा स्पष्ट दिसते.

आध्यात्मिक दृष्टिकोन

आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्राण, चक्र, तेज ही संकल्पना प्राचीन आहे. योग, वेद, उपनिषद, बौद्ध आणि ताओ परंपरांमध्ये Aura ला वेगळ्या नावाने ओळखलं जातं – पण मूळ भावार्थ एकच: प्रत्येक जिवंत किंवा निर्जीव गोष्टीकडे एक उर्जा क्षेत्र असतं.

ओरा कसा वाढवावा?

आपल्या ओऱाला तेजस्वी बनवण्यासाठी ध्यान, प्राणायाम, सकारात्मक विचार, सात्विक आहार, आणि सतत चांगल्या संगतीचा प्रभाव उपयोगी ठरतो. जेवढे आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो, तेवढं आपलं ओरा तेजस्वी होतं – आणि त्याचा प्रभाव आपोआपच दुसऱ्यांवर पडतो.


निष्कर्ष

ओरा ही केवळ एक अध्यात्मिक संकल्पना नसून, विज्ञान आणि अनुभूती यांचं संगमबिंदू आहे. स्वामी विवेकानंद, विराट कोहली किंवा रोनाल्डोसारखे व्यक्तिमत्त्व आपल्याला याच उर्जेच्या प्रभावाची जाणीव करून देतात. आपले विचार, भावना आणि कृती यावरून हे ओरा घडतं – आणि तेच आपल्या आयुष्याला प्रभावशाली बनवतं.



टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने