युरोपातील अचानक वीज यंत्रणा ठप्प – संकट का आणि कसे?
सध्या
युरोपातील अनेक देश गंभीर संकटात सापडले आहेत. स्पेन, पोर्तुगाल, फ्रान्सचा दक्षिण
भाग, मोरोक्को, इटलीचा उत्तर-पश्चिम भाग, स्वित्झर्लंड आदी ठिकाणी वीज
ग्रिड पूर्णपणे फेल झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
परिणाम:
- संपूर्ण
वीजपुरवठा खंडित
- संगणक
बंद, सर्व्हर डाऊन
- ट्रॅफिक
लाइट, मॉल्समधील POS मशीन, वेबसाइट्स ठप्प
- मेट्रो
सेवा, विमानसेवा बंद किंवा विलंबित
- इंटरनेट
व मोबाईल नेटवर्क बंद
- पाणीपुरवठा
ठप्प
- लोकांमध्ये
खरेदीसाठी घबराट (panic buying)
- कार्ड
पेमेंट अयशस्वी
- पोलिसांना
गर्दी नियंत्रणासाठी झगडावे लागत आहे
शंका व शक्य कारणे:
- सोलर स्टॉर्म (सौर वादळ):
सौर ज्वाळा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रात गोंधळ निर्माण करून ट्रान्समिशन लाईनमध्ये खराबी करू शकतात.
पण NASA व ESA कडून सध्या सौर वादळ झाल्याची कोणतीही पुष्टी नाही. - सायबर हल्ला:
ही शक्यता मोठ्या प्रमाणावर चर्चेत आहे. कारण आज सर्व वीज घर संगणकाद्वारे नियंत्रित होतात.
काही तज्ज्ञांचा अंदाज – हे सायबर हॅकिंगद्वारे "targeted grid shutdown" असू शकते. - सिस्टम ओव्हरलोड:
अचानक हवामान बदलामुळे वीज मागणी वाढली आणि ग्रिड अस्थिर झाले.
वीज साठवून ठेवता येत नाही, ती जशी तयार होते तशीच वापरावी लागते.
मागणी किंवा पुरवठा अचानक बदलल्यास ग्रिड कोसळते.
तांत्रिक मुद्दा:
थर्मल
पॉवर स्टेशन बंद करणे सहज शक्य नसते. ते पुन्हा सुरू करण्यासाठी 2–3 दिवस लागतात.
वीज ही 50 Hz फ्रीक्वेन्सीवर चालते. ओव्हरलोड किंवा अतीकमी लोड झाल्यास ही फ्रीक्वेन्सी
ढासळते आणि संपूर्ण सिस्टम कोसळू शकते.
निष्कर्ष:
सध्याची परिस्थिती ही केवळ तांत्रिक बिघाड नाही, तर सायबर सुरक्षा, हवामान बदल, आणि
ऊर्जेच्या जागतिक व्यवस्थापनाचा अलार्म आहे.